अखेर कांतारा ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित
बंगळुरू, 24 नोव्हेंबर (हिं.स) अभिनेते ऋषभ शेट्टी यांचा नूतन बहुचर्चित, यशस्वी आणि अखिल भारतीय चि
कांतारा


बंगळुरू, 24 नोव्हेंबर (हिं.स)

अभिनेते ऋषभ शेट्टी यांचा नूतन बहुचर्चित, यशस्वी आणि अखिल भारतीय चित्रपट ' कांतारा ' ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. कांतारा ऍमेझॉन प्राईमवर कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि भाषेत इंग्रजी सह-शीर्षकांसह उपलब्ध होणार आहे. हिंदी भाग नंतर उपलब्ध होईल.

कांतारा हा कर्नाटकातील ग्रामीण परंपरा आणि चालीरीतींवर आधारित आहे आणि जगभरात 400 कोटींहून अधिक कमाई केल्यामुळे सर्व भाषिक प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिली.या चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत असून त्याने चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.मूळ कन्नड भाषेत असलेल्या या चित्रपटास प्रेक्षक तसेच समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित, कांतारामध्ये सप्तमी गौडा, किशोर, अच्युत कुमार, किशोर आणि इतर महत्त्वाच्या भूमिका आहेत. अंजनीश लोकनाथ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आहेत.

कांतारा ने चित्रपटगृहात अविश्वसनीय आणि अदभुत असा 50 दिवसांचा प्रवास पूर्ण केला आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा हिंदी भाषेत भव्य विक्रम आणि विजय संपादित करून बाहुबली, आरआरआर, केजीएफ 2, पुष्पानंतर भाषा, प्रांत, संस्कृती आणि देशाच्या सीमा ओलांडल्या असून प्रस्थापित हिंदी चित्रपटांना मात देत विजययात्रा कायम ठेवली आहे.

केजीएफ निर्माते होम्बाले फिल्म्स कांतारा चे निर्माता आहेत.

imdb.com नुसार कांतारामध्ये कांबला आणि भूत कोला संस्कृतीचा समावेश आहे.या कथेत एक मानव आणि निसर्ग संघर्ष आहे जिथे शिवा आपल्या गावाचे आणि निसर्गाचे रक्षण करतो. एका मृत्यूमुळे गावकरी आणि वाईट शक्तींमध्ये युद्ध होते. तो गावात शांतता प्रस्थापित करू शकेल का? संपूर्ण चित्रपट 96 दिवसात चित्रित करण्यात आला आणि एका महिन्यात कांतारा ने जवळजवळ 188 कोटी कमावले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande