चिपळूण - रिक्षा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण शिबिर होणार ३० नोव्हेंबरला
रत्नागिरी, 24 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूण येथे येत्या ३० नोव्हेंबर रोजी रिक्षा योग्यता प्रमाणपत्र
चिपळूण - रिक्षा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण शिबिर होणार ३० नोव्हेंबरला


रत्नागिरी, 24 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूण येथे येत्या ३० नोव्हेंबर रोजी रिक्षा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण शिबिर होणार आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या चिपळूण येथील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण ब्रेक टेस्ट ट्रॅक येथे दर महिन्याच्या गुरुवार आणि शुक्रवारी होते. या महिन्यात ३० नोव्हेंबर रोजी चिपळूण येथे ऑटोरिक्षा योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे अतिरिक्त कामकाज करण्यात येणार आहे.

या शिबिरात फक्त रिक्षाच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज करण्यात येईल. ऑनलाइन अपॉइंटमेंट २५ नोव्हेंबरपासून खुल्या करण्यात येतील, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande