घोटाळे टाळण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित त्रयस्थ यंत्रणांकडून प्रमाणीकरणाचे सेबी अध्यक्षांकडून समर्थन
मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : घोटाळे टाळण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित त्रयस्थ पक्षाकडून प्रमाणीकरण
माधवी पुरी बुच


मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : घोटाळे टाळण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित त्रयस्थ पक्षाकडून प्रमाणीकरणाचे सुरक्षा आणि विनिमय मंडळाच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांनी समर्थन केलं. भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागातर्फे मुंबईत आयोजित लेखापरीक्षण सप्ताहाच्या समारोप समारंभात त्या लेखापरीक्षकांना संबोधित करत होत्या. या वर्षी देशभरातील भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग कार्यालयांकडून दुसऱ्या लेखापरीक्षण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

लेखापरीक्षणाच्या प्रक्रियेत त्रयस्थ -पक्षाकडून/ यंत्रणांकडून प्रमाणीकरणासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली . आपण सादर करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे खरे आणि निष्पक्ष चित्र सुनिश्चित करण्याचा त्रयस्थ पक्षाकडून प्रमाणीकरण हा एकमेव मार्ग आहे. त्रयस्थ -पक्षाकडून प्रमाणीकरणावर सेबीकडून दिला जाणारा भर यामागे बाजारात जे काही सादर केले जाते त्याचे खरे आणि निष्पक्ष चित्र सुनिश्चित करण्याची वचनबद्धता आहे असे सेबीच्या अध्यक्ष म्हणाल्या.

देशात 20 पेक्षा जास्त अशी संकेतस्थळे आहेत ज्यांचा वापर लेखापरीक्षण होत असलेल्या कंपनीचा दावा प्रमाणित करण्यासाठी लेखापरीक्षक वापरू शकतात. “घोटाळे करणाऱ्यांकडून तंत्रज्ञानाचा वापर एक साधन म्हणून होत असताना, आपण घोटाळे टाळण्यासाठी त्याच तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. त्रयस्थ पक्षाकडून प्रमाणीकरण करण्यासाठी लेखापरीक्षक GSTN पोर्टल, बँक वेबसाइट्स इत्यादी साधनांचा वापर करू शकतात असे सेबीच्या अध्यक्ष म्हणाल्या.

‘प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची भूमिका’ या विषयावर बोलताना सेबीच्या अध्यक्ष म्हणाल्या की, जर बाजारात पारदर्शकता असेल, तर बाजारातील घटक स्वत: कार्यक्षमतेने कार्य करतात आणि आणि बाजारात काहीही चुकीचे होणार नाही याकडे लक्ष देतात. “ एक नियामक म्हणून संपूर्ण बाजाराचे खरे आणि निष्पक्ष चित्र सादर करण्यासाठी सेबी जबाबदार आहे, म्हणूनच आम्ही पारदर्शकतेबाबत आग्रही आहोत. माहितीमध्ये कोणतीही विसंगती नसणे हा कार्यक्षम बाजारपेठेचा पाया आहे .

लेखा परीक्षकांच्या कामाचे कौतुक करताना, सेबी अध्यक्ष म्हणाल्या , आघाडीचा उद्योजक अथवा संस्थेचे नेतृत्व या नात्याने माहिती वगळणे किंवा स्वीकारणे याबाबत चूक होणार नाही हे सुनिश्चित करणे हे आपले दायित्व आहे. . लेखापाल आपल्याला हे साध्य करण्यात मदत करतात आणि आपली मानसिक शांती सुनिश्चित करतात असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लेखापरीक्षकांना प्रोत्साहन देताना सेबीच्या अध्यक्षा म्हणाल्या की त्या लेखापरीक्षकांना मुक्त सल्लागार मानतात. कोणत्याही प्रकटीकरण दस्तावेजात , त्रुटी, माहिती वगळणे, संदर्भांना विस्कळीत करणे ,नाकारणे, कमी दाखवण्याचा प्रयत्न, अतिशयोक्ती, बनावटपणा यासारखे घटक तपासणे गरजेचे आहे.

प्रशासनाबाबत बोलताना सेबीच्या अध्यक्ष म्हणाल्या की सदसद्विवेकबुद्धी हे मार्गदर्शक तत्व आहे. उद्या वृत्तपत्रांमध्ये जेव्हा हे प्रकाशित होईल तेव्हा मी याचा बचाव करू शकेन की नाही हे स्वतःला विचारा.

कार्यक्रमाचे तपशील सामायिक करताना, भारतीय लेखा परीक्षण व लेखा विभागाचे महासंचालक गुलझारी लाल म्हणाले, “या देशातील तरुणांपर्यंत आमची पोहोच वाढवण्याचा प्रयत्न करताना आम्ही विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली. हिंदी आणि इंग्रजी भाषेतील या स्पर्धेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. प्रमुख संस्था आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून हजाराहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. या वर्षाच्या निबंधाची संकल्पना भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा म्हणजे 2047 मध्ये कॅगची भूमिका यावर आधारित असून हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी काय करता येईल यावर केंद्रित आहे.

1860 मध्ये पहिल्या महालेखा परीक्षकांनी या कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला त्या दिवसाची आठवण म्हणून लेखापरीक्षण दिन साजरा केला जातो.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande