नेत्राचं हे बदलेलं रूप रुपालीची झोप उडवणार !
मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : नेत्राला राजाध्यक्ष कुटुंबातून बाहेर काढण्यात रुपाली यशस्वी होते. त्य
नेत्रा


मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : नेत्राला राजाध्यक्ष कुटुंबातून बाहेर काढण्यात रुपाली यशस्वी होते. त्यामुळे नेत्रा तिच्या घरी परत जाते. अद्वैतवर हल्ला होतो, हे नेत्रा शेखरला सांगते त्यामुळे अद्वैतचा जीव वाचतो. शेखर नेत्राला राजाध्यक्ष कुटुंबात परत आणतो आणि नेत्राची खरी ओळख सगळ्यांना सांगतो. अशा प्रकारे, सगळ्यांना समजतं की नेत्रा ही अव्दैतचं रक्षण करण्यासाठी या घरात आलेली आहे. अद्वैत यावर विश्वास ठेवत नाही. दुसरीकडे, नेत्रा आणि रुपाली एकमेकांसमोर येतात आणि एकमेकांना आव्हान देतात. नेत्रा रुपालीला अद्वैतच्या आईच्या रूपात दिसल्याचा भास होतो. आता नेत्राचं हे बदलेलं रूप रुपालीची झोप उडवणार का? हे पाहणे रोमांचक असणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande