पोलिसाच्या घरातून १७ तोळे सोन्यासह ५७ हजार रुपये लंपास
धुळे, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : शहरपोलीस स्टेशन हद्दीत श्रीनगर येथे पोलिसाच्याच घरात चोरांनी डल्लामारल
संग्रहित


धुळे, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : शहरपोलीस स्टेशन हद्दीत श्रीनगर येथे पोलिसाच्याच घरात चोरांनी डल्लामारल्याची घडना आज उघडकीसआल्याने एकच खळबळ उडालीआहे. चोरट्यांनी जबर घरफोडीकरीत १७ तोळे सोनेसह ५७ हजाररुपये रोख रक्कम लंपास केलाआहे.

यासंदर्भातील माहितीनुसार, धुळे शहरातील चित्तोड रोडपरिसरातील कैलास नगर जवळअसलेल्या श्रीनगर येथीलघरमालक राकेश शांताराम ठाकूरहे महाराष्ट्र पोलीस विभागात भाईंदरयेथे कार्यरत असून यांच्या घरातरात्री चोरांनी चोरी केली. राकेशठाकूर आपल्या परिवारासहितबाहेरगावी गेले असल्याचीचोरट्यांनी संधी साधत श्रीनगरयेथील प्लॉट नंबर ९३ येथीलराहत्या घराचे कंपाउंड गेटच्या कडीतोडून घराच्या मागील दरवाजाचेकुलूप तोडून आत शिरकाव केला.घरातील कपाटा मधील १७ तोळेसोने व ५७ हजार रुपये रोख रक्कमचोरट्यांनी चोरून पसार झाले. यासंदर्भात शेजारच्यांनी घरमालकराकेश ठाकूर यांना कळविले ते घरीआले असता कपाटातील रोख ५७हजार व कॉटमध्ये ठेवलेले १७ तोळे सोने चोरट्यांनी लंपासकेल्याचे निदर्शनास आले.सोन्यासह रोख रक्कम ही पोलीसकर्मचारी राकेश ठाकूर यांनीआपल्या नव्या घरचे स्वप्न साकारहोण्यासाठी जमवलेली होती. परंतु चोरट्यांनी या स्वप्नाचा भंग केले आहे.

या संदर्भात ठाकूर यांनी शहरपोलीस ठाणे येथे संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच ठसे तज्ञसहाय्यक पोलीस निरीक्षक कनिष्ठतज्ञ वाय.पी.राजपूत,चालक पोलीसहेडकॉन्स्टेबल राजू मिस्तरी,पोलीसहेडकॉन्स्टेबल धनंजय मोरे,पोलीसकॉन्स्टेबल एम.एस.ब्राह्मणे,पोलीसकॉन्स्टेबल प्रशांत माळे,आदी सर्वपथक या ठिकाणी दाखल झाले होते.तर या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande