अकोला - मोटारसायकल चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद
अकोला, 4 डिसेंबर, (हिं.स.) स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारा कडून खात्रीलायक बातमी मिळाली कि, जु
photo


अकोला, 4 डिसेंबर, (हिं.स.) स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारा कडून खात्रीलायक बातमी मिळाली कि, जुने शहर, अकोला येथे राहणारा सुरेश रामभाउ खरबडकर वय ३० वर्ष, याने अकोला शहर, पोस्टे, बाळापूर, पातुर मुर्तीजापुर शहर व बाहेर जिल्हा हद्दीत मोटर सायकली चोरी केली आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सदर माहिती पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांना देऊन त्यांचे आदेशाने तथा मार्गदर्शनाखाली शासकीय वाहणाने जाउन नमुद संशइतास ताब्यात घेउन विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन बारकाईने विचारपूस केली असता मोटर सायकलींची विविध ठिकाणा वरून चोरी करून काही मोटर सायकली लोकांना विश्वासात घेउन विकल्याचे सांगितले.

वरून अभिलेख पडताळणी केली असता, पो.स्टे. खदान हद्दीत १) मोटर सायकल चोरीबाबत अप.क्र.८२९/२०२२क.३७९ भा. दं. वि. प्रमाणे गुन्हा दाखल असुन नमुद आरोपी यांने त्याचा मित्र सिद्धांत महेंद्र सुरडकर रा. म. फुले नगर, सिंधी कॅम्प, अकोला चे मदतीने नमुद गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेउन त्यांचेकडुन गुन्हयात चोरी गेलेली मोसा व गुन्हा करण्याकरीता वापरलेली मोसा असे २ मोसा. जप्त करून पुढील कारवाई करीता पोस्टे. खदान, अकोला यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

तसेच वर नमुद गुन्हयाचे तपासादरम्यान आरोपी सुरेश रामभाऊ खरबडकर याने अकोला जिल्हा व बाहेर जिल्हयातील मोटर सायकल चोरी चे गुन्हयाची कबुली दिली वरुन त्यांचे कडुन १) खदान २) पोस्टे. कोतवाली ३) पोस्टे. सिव्हिल लाईन ४) पोस्टे. रामदासपेठ ५ ) पोस्टे. बाळापुर ६) पोस्टे. पातुर (७) पोस्टे. मुर्तीजापुर शहर ८) पोस्टे. खामगाव शहर जि. बुलढाणा ९) पोस्टे. मुगरूळपीर जि. वाशिम १० ) पोस्टे. दर्यापुर जि. अमरावती अंतर्गत गुन्हयातील १६ मोटर सायकली तसेच चोरी केलेले व संशयास्पद स्थितीत मिळुन आलेल्या २ मोटर सायकल असे एकुण- २० मोटर सायकली एकुण किंमत ६,८५,०००/- रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक शसंदिप घुगे,अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती मोनिका राउत, पोनि. संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि, मुकुंद देशमुख, पोहेकॉ. दत्तात्रय ढोरे, पो. अंमलदार श्रीकांत पातोंड, विशाल मोरे, रविंद्र पालीवाल चालक अंमलदार विजय कबले, इमरान अली, स्थानिक गुन्हे शाखा अकोला व पो. अंम. गोपाल ठोंबरे, गणेश सोनोने सायबर शाखा यांनी केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande