औरंगाबाद - बनावट लग्न करुन लुटणारी टोळी गजाआड
औरंगाबाद, 4 डिसेंबर (हिं.स.) गरीब व आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या ,लवकर लग्न न जमणार्या तरुणाच्या
औरंगाबाद - बनावट लग्न करुन लुटणारी टोळी गजाआड


औरंगाबाद, 4 डिसेंबर (हिं.स.) गरीब व आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या ,लवकर लग्न न जमणार्या तरुणाच्या कुटुंबाला हेरून सदरच्या कुटुंबाला जातीतील मुलगी असल्याचे बतावणी करत बनावट लग्न लावून लाखो रुपया सह सोन्या चांदीचे दागिने घेऊन पसार होणारी टोळी पैठण पोलिसांनी ताब्यात घेतली. यात बनावट नवरी मुलीसह चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाथसमाधी मंदिर परिसरातील वाहनतळ येथे काही संशयित व्यक्ती लग्नाचा बनाव करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना मिळाली. पो. नि.किशोर पवार यांनी सदरची माहिती पेट्रोलिंग पथकास दिली व घटनास्थळी पाठविले यावेळी पोलिस पथकास वधु व वराच्या वेषात असलेले व त्यांच्या सोबत असलेल्या वर्हाडी व्यक्तींची विचारपुस केली असता वधु पक्षाकडील व्यक्तींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांमुळे पैठण पोलीसांना सदर लग्नाबाबत संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी वधुपक्ष व वर पक्षातील लोकांना पोलीस ठाणे येथे आणून सखोल चौकशी केली यावेळी धक्कादायक माहिती समोर आली प्रकाश गणेश मोरे वय 24 वर्षे रा. टाकेशिवणी ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा या युवकाचे लग्न जुळत नसल्याने आंबादास नवनाथ नागरे रा. दहेगाव ता. शेवगाव जि.अ.नगर ह.मु.नारळा, पैठण याने प्रकाश मोरे यांच्या वडीलांना माझ्या परिचयाची एक मुलगी असुन तिला आई वडील नाही व एक भाऊ आहे. ती मुलगी परिस्थितीने गरीब आहे. तुमच्या मुलाचे त्या मुलीचे तुमच्या मुलासोबत लग्न लावुन देतो. त्या मोबदल्यात 1 लाख 50 हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणुन शनिवार रोजी मुलगी पाहण्यासाठी पैठण येथे बोलावुन लग्नाची तयारी केली यावेळी सोन्याचांदीचे दागीने व कपडे असे एकुन 18 हजार 758 रुपयांची खरेदी करण्यास भाग पाडले व स्वतच्या ताब्यात घेतले दरम्यान फसवणूक झालेल्या प्रकाश गणेश मोरे यांच्या फिर्यादिवरून आरोपी आंबादास नवनाथ नागरे रा. दहेगाव ता. शेवगाव जि.अ.नगर ह.मु.नारळा, पैठण ता. पैठण, राजु अंकुश चाबुकस्वार वय 39 वर्षे रा. चन्नापुरी ता. अंबड जि.जालना ,उमेश गणेश गिरी वय 22वर्षे रा. तिर्थापुरी ता. घनसांवगी जि. जालना ,शिला मनोहर बनकर वय 35 वर्षे रा. एकतुनी ता.पैठण जि.औरंगाबाद यांचे वर पैठण पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक ग्रामीण मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, महिला उपनिरीक्षक स्वाती लहाने, पोउपनि संजय मदने, पोहेकॉ सुधीर ओव्हळ, पोअं. सचिन आगलावे, पो.अं. बाबासाहेब शिंदे यांनी केली असुन पुढील तपास पोउपनि मदने, पोना जिवडे करत आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande