रत्नागिरी : वीजबिलाच्या नावाखाली ४६ हजारांचा गंडा
रत्नागिरी, 5 डिसेंबर, (हिं. स.) : भरणे (ता. खेड) येथील समर्थनगरात राहणाऱ्या विजेचे बिल सुधारित करण्य
रत्नागिरी : वीजबिलाच्या नावाखाली ४६ हजारांचा गंडा


रत्नागिरी, 5 डिसेंबर, (हिं. स.) : भरणे (ता. खेड) येथील समर्थनगरात राहणाऱ्या विजेचे बिल सुधारित करण्याच्या नावाखाली ४६ हजारांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. आदेश अनंत भोसले (वय ३८, समर्थनगर, भरणे, खेड) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश भोसले याच्या व्हॉटस् ऍप नंबरवर एका अनोळखी व्यक्तीने मेसेज केला. गेल्या महिन्याचे लाइट बिल अपडेट न केल्यामुळे तुमची वीज रात्री साडेनऊ वाजता तोडण्यात येणार आहे, असा तो मेसेज होता. आपली वीज कापली जाऊ नये, असे वाटत असेल तर एनीडेस्क ऍप डाउनलोड करा, असे त्याने सांगितले. त्यानंतर पेंडिग बिल भरण्यासाठी फोन येऊ लागले. शेवटी एनीडेस्क ऍप डाउनलोड केल्यानंतर लगेचच ४८ हजार ६०० रुपये अकाउंटमधून वळते केले गेल्याचे आदेशला दिसले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आदेशने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञातावर माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande