महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीची महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या ईडेल बरोबर भागीदारी
मुंबई, ६ डिसेंबर, (हिं.स) : भारतातील एकात्मिक लॉजिस्टिक आणि मोबिलिटी सोल्यूशन्स पुरवठादारांपैकी एक म
महिंद्रा लॉजिस्टिक्स


मुंबई, ६ डिसेंबर, (हिं.स) : भारतातील एकात्मिक लॉजिस्टिक आणि मोबिलिटी सोल्यूशन्स पुरवठादारांपैकी एक महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड (एमएलएल) ने महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीच्या सहकार्याने इलेक्ट्रिक वाहनांवर एमएलएलच्या लास्ट-माईल डिलिव्हरी कार्गो सेवा ईडेल साठी महिला ड्रायव्हर नियुक्त करत असल्याची घोषणा केली आहे.

रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या सरकारच्या धोरणाला महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी ईडेल महिला ड्रायव्हर्सना रोजगार उपलब्ध करून देईल. त्यांना ईव्ही चालवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे विशेष प्रशिक्षित केले जाईल.

एमएलएलच्या १००० वर्तमान ईव्हीच्या ताफ्यातील ८५% महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी तीनचाकीद्वारे समर्थित आहेत. अलिकडेच सादर केलेले Zor Grand DV १७० cu.ft फॅक्टरी फिट डीव्ही बॉक्ससह असून ते एका चार्जवर १०० किलोमीटर रेंजचे आश्वासन देतात. त्यांची १.५ लाख किलोमीटर/५ वर्षांची बॅटरी वॉरंटी आहे आणि ही ताफ्या मधील सर्वात अलिकडची भर आहे. झोर ग्रँड डीव्ही चा वापर ई-कॉमर्स, एफएमसीजी, रिटेल, फार्मा आणि इतर अनेक पहिल्या आणि लास्ट माईल उपयोजनात केला जाऊ शकतो. एमएलएल सध्या पुढील ६ महिन्यांमध्ये (भारतभर) १००० मोठ्या क्युबिक साईझ वाहनांसह त्यांच्या ताफ्याचा विस्तार करण्याच्या प्रक्रियेत आहे. या जोडीलाच् कंपनी त्यांच्या लवकरच सादर होणार्या इलेक्ट्रिक दुचाकी कोचीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर चालवत आहे, ज्या देशभरात सादर केल्या जातील. ही वाहने रिचार्ज करण्यासाठी २० ईव्ही चार्जिंग हब देखील उभारण्यात आले आहेत.

या घोषणेवर भाष्य करताना महिंद्रा लॉजिस्टिकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामप्रवीण स्वामिनाथन म्हणाले: आम्ही आमचे कर्मचारी, सहयोगी, व्यावसायिक भागीदार, ग्राहक आणि समुदाय यांच्यातील विविधतेला प्रोत्साहन आणि महत्त्व देतो. महिलांना समान संधी देऊन आमचे कार्यस्थळ आकर्षक बनवण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम हातात घेतले आहेत. बेंगळुरूमध्ये ईडेल साठी महिला चालकांची नियुक्ती करणे हे या दिशेने एक पाऊल आहे. विस्तार योजनेचा एक भाग म्हणून; जास्तीत जास्त महिला चालक तथा मालक, फ्लीट मालक आणि इतर वाहतूकदारांना लास्ट माईल डिलिव्हरीसाठी ईडेल मध्ये सामील होण्याकरता प्रोत्साहित केले जाईल. या सहयोगींना त्यांच्या दीर्घकालीन करिअरचा विकास आणि रोजगार सक्षम करणाऱ्या कौशल्यांसह सक्षम बनवून आमच्या मोठ्या RISE उद्देशासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

महिंद्रा इलेक्ट्रिक - लास्ट माईल मोबिलिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा म्हणाल्या, आमच्या इलेक्ट्रिक तीनचाकी महिलांसाठी रोजगार निर्माण करणाऱ्या आहेत. त्यायोगे त्यांना ईव्ही क्रांतीचा अविभाज्य भाग बनण्यास मदत करत आहेत. ट्विस्ट अँड गो ऑपरेशन, हादरे आणि आवाज-मुक्त वाहन चालविण्याचा अनुभव, विश्वासार्हता, तसेच सर्वोत्तम अशी मालकीची एकूण किंमत (TCO) महिलांना त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी ईव्ही चालविण्यास प्रवृत्त करते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande