व्होल्टासने एप्रिल २०२२ मध्ये तीन अंकी व्हॉल्यूम वृद्धी केली साध्य
मुंबई, २५ मे, (हिं.स) : टाटा समूहातील एक कंपनी आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचा एसी ब्रँड व्होल्टास ल
Voltas


मुंबई, २५ मे, (हिं.स) : टाटा समूहातील एक कंपनी आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचा एसी ब्रँड व्होल्टास लिमिटेडने एप्रिल २०२२ मध्ये देशभरात पसरलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे कूलिंग उत्पादनांच्या मागणीत तीन अंकी वाढ नोंदवली. कूलिंग उत्पादनांच्या विभागाच्या व्हॉल्युम्सनी एप्रिल २०२२ मध्ये अनेक विक्रम तोडले आहेत.

रूम एअर कंडिशनर श्रेणीमध्ये व्होल्टास एक दशकाहून अधिक काळापासून, बाजारपेठेत पहिला क्रमांक कायम राखत निर्विवादपणे आघाडीवर आहे. आर्थिक वर्ष २०२२ मधील मार्चच्या आकडेवारीनुसार आपल्या सर्वात जवळच्या स्पर्धकापेक्षा ६४० बीपीएस पेक्षाही पुढे राहून, या ब्रँडने स्पर्धेमध्ये आपली आघाडी कायम राखली आहे. आर्थिक वर्ष २०२३ ची आपली व्यावसायिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी हा ब्रँड सुसज्ज आहे.

ब्रँडच्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना व्होल्टास लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री प्रदीप बक्षी म्हणाले, एप्रिल २०२२च्या उन्हाळ्याने गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत अभूतपूर्व वाढ साध्य करण्यात आम्हाला मदत केली आहे. व्हॉल्यूमच्या संदर्भात आमचा रूम एसी बिझनेस १७०% पेक्षा जास्त वाढला आहे. कूलिंग उत्पादनांच्या एकूण व्यवसायात १६०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे आणि आमच्या घरगुती उपकरणांच्या व्हॉल्यूममध्ये ७५% ची वाढ झाली आहे. कमर्शियल रेफ्रिजरेशनमध्ये कंपनीने २०२२ च्या एप्रिलमध्ये १२५% ची वाढ नोंदवली आहे. आम्ही असे मानतो की, आमची व्यापक उपस्थिती, नवनवीन चॅनेल्सवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण, उत्कृष्ट वितरण नेटवर्क, सर्वात मजबूत ब्रँड इक्विटी आणि ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स या सर्व गोष्टी ब्रँडला उद्योगक्षेत्रात आघाडीवर राहण्यात मदत करतील.

त्यांनी पुढे सांगितले, वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत आणि आम्हाला आशा आहे की आर्थिक वर्ष २०२३ साठी ठरवण्यात आलेली व्यावसायिक उद्दिष्ट्ये आम्ही पूर्ण करू शकू.

२४००० कस्टमर टच पॉईंट्स व्यतिरिक्त व्होल्टासने एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्सचे (ईबीओ) एक विशाल नेटवर्क उभारले आहे आणि आर्थिक वर्ष २०२३ च्या अखेरपर्यंत अजून अनेक ब्रँड शॉप्स व एक्स्पीरियंस झोन लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीने यंदाच्या उन्हाळ्यासाठी एक प्रभावी उत्पादन पोर्टफोलिओ बाजारपेठेत दाखल केला आणि देशातील प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना तंत्रज्ञानदृष्ट्या आधुनिक उत्पादनांमध्ये श्रेणीतील सर्वश्रेष्ठ अनुभव मिळवण्यात सक्षम बनवण्यासाठी अनेक ब्रँड शॉप्स सुरु केली आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande