उद्योजकतेला चालना देण्यासाठी वाशिममध्ये उद्यमिता यात्रेचे आयोजन
वाशिम, 26 मे (हिं. स) : लघू व सुक्ष्म व्यवसाय, कौशल्य व्यवसाय आणि तरुणांमधील उद्योजकतेला चालना देण्
उद्योजकतेला चालना देण्यासाठी

उद्यमिता यात्रा 31 मे ते 2 जून दरम्यान जिल्हयात


वाशिम, 26 मे (हिं. स) : लघू व सुक्ष्म व्यवसाय, कौशल्य व्यवसाय आणि तरुणांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे. ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्हयात तीन दिवस युवक-युवतींना विनामुल्य उद्योजकता प्रशिक्षण देणार आहे. वाशिम येथे उद्यमिता यात्रेचे आगमन 31 मे रोजी होणार असून ही यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथील सभागृहात 31 मे, 1 व 2 जून या तीन दिवशीय उद्योजकतेबाबतचे विविध प्रकारचे प्रशिक्षण देणार आहे. तरी जिल्हयातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी या यात्रेचा लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

या प्रशिक्षणाअंतर्गत 31 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजता दरम्यान उदघाटन होणार आहे. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत डेव्हलपींग बिझिनेस आयडिया या विषयी, दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत व्हाय बिझिनेस फेल यावर सविस्तर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 1 जून रोजी आर्थिक साक्षरता व्यवसायाच्या नियोजनाचे महत्व आणि व्यवसायाचे नियोजन कसे विकसीत करावे याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 2 जून रोजी प्रेझेंटेशन ऑफ बिझिनेस आयडियाज, फंडिग ॲन्ड लिगल कंप्लायंसेस फॉर बिझिनेस यावर विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असून प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे.

या उद्यमिता यात्रेअंतर्गत मोफत उद्योजकता प्रशिक्षणाचा लाभ जिल्हयातील उद्योग व्यवसाय करु इच्छिणाऱ्या युवक-युवती, कौशल्यधारक उमेदवार व विविध बचतगटातील सदस्यांनी घ्यावा. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी https://forms.gle/or8bgAHJQZDvF25V6 या लिंकवर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी युथ ॲन्ड फाऊंडेशन पुण्याचे वाशिम येथील जिल्हा समन्वयक राजेंद्र मोरे (9404818737) तसेच लिंक मिळविण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या जिल्हा कार्यालयाशी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप भ्रमणध्वनी क्रमांक 9850983335/7875798684/9764794037 व 9423956011 यावर संपर्क साधावा.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande