धुळ्यात कंटेनरमधून ६७ गायींची निर्दयीपणे वाहतुक, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे, 22 जून (हिं.स.) मुंबई-आग्रा महामार्गावरील वर्षी फाट्याजवळून धुळेकडे येणार्या बंदिस्त कंटेनरमधू
धुळ्यात कंटेनरमधून ६७ गायींची निर्दयीपणे वाहतुक, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त


धुळे, 22 जून (हिं.स.) मुंबई-आग्रा महामार्गावरील वर्षी फाट्याजवळून धुळेकडे येणार्या बंदिस्त कंटेनरमधून ६७ गायी निर्दयीपणे भरून कत्तलीच्या उद्देशाने नेत असतांना पोलीसांच्या निदर्शनास आले. पोलीसांनी कंटेनर ताब्यात घेतला असून अंधाराचा फायदा घेवून कंटेनर चालक पळून गेला.

पोकॉ.सुरेंद्र दयाराम खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वर्षी फाट्याजवळ जनावरांचा कंटेनर पकडला फाट्यावर शिरपूर येथून धुळे कडे बंदिस्त कंटेनर क्र. एच.आर.६१/ सी-०४९० जात होता. पोलीसांनी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास कंटेनर अडवून तपासणी केली असता, बंदिस्त कंटेनर मध्ये ३ लाख ६ हजार रूपये किंमतीचे गुरांचे तोंड बांधून निर्दयीपणे कोंबलेले आढळून आले. यावेळी १२ लाख रूपयांचे बंदिस्त कंटेनर व ६७ गायी असा एकूण १५ लाख ६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीसांनी कंटेनर अडवताच चालक पहाटे अंधाराचा फायदा घेवून फरार झाला. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२९, सन १९६० चे कलम ११(घ)(ड)सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ चे कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande