एकनाथ शिंदेंनी धुडकावला मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव
फेसबुल लाईव्हला दिले ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर मुंबई, 22 जून (हिं.स.) : मुख्यमंत्री उद्धव ठा
एकनाथ शिंदे


फेसबुल लाईव्हला दिले ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर

मुंबई, 22 जून (हिं.स.) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुक-लाईव्ह करत बंडखोरांना परत येण्याचे आवाहन केले. तसेच राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. याला एकनाथ शिंदे यांनी ट्विट कर प्रत्युत्तर दिलेय. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव धुडकावत शिवसेनेत परतण्यास नकार दिलाय.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच आघाडीतून बाहेर पडणे का गरेजचं आहे? हे ट्विटमधून त्यांनी स्पष्ट केलेय. यासंदर्भात शिंदे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. त्यामुळे पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे सांगत महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे असे शिंदे यांनी नमूद केलेय.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागलं. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचं समजतं. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे. याठिकाणी शिंदेंना समर्थक आमदार येऊन भेटत असून दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आपले शासकीय निवास सोडून मातोश्रीकडे प्रस्थान केलेय.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande