जळगाव - गुटख्यासह व्यापारी ताब्यात
जळगाव, 22 जून (हिं.स.) जिल्ह्यातील बोरद आऊट पोस्टच्या पोलिस कर्मचार्यांनी लाखो रुपयांचा पान मसाला ग
जळगाव - गुटख्यासह व्यापारी ताब्यात


जळगाव, 22 जून (हिं.स.) जिल्ह्यातील बोरद आऊट पोस्टच्या पोलिस कर्मचार्यांनी लाखो रुपयांचा पान मसाला गुटखा जप्त केला. याप्रकरणी एका व्यापार्यास ताब्यात घेण्यात आले आहे. पपिल बाबूलाल जैन (वय ३०, रा.म्हसावद, ता.शहादा) हे कारमधून (एमएच ३९, एबी.७३३७) म्हसावद कडे जात असताना गुटखा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी त्यांची कार बोरद येथील शहादा चौफुलीजवळ अडवून तपासणी केली. यात १ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचे तसेच १,१२,२०० रुपये किमतीचे त्याचबरोबर १३,२०० रुपये किमतीचे तसेच १९,८०० रुपये किमतीचे ३ सफेद रंगाच्या छोट्या गोण्या तसेच प्रत्येक गोणीत ४ प्लास्टिकचे कट्टे असे एकूण १२ कट्टे व प्रत्येक कट्ट्यात ५० व्ही १ नावाचे तंबाखूचे प्लास्टिकचे पाऊच ६०० प्रत्येक पाऊचवर छापील किंमत ३३ रुपये याप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस नाईक विजय गोपाल विसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पपिल बाबूलाल जैन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande