भारत आणि नेपाळ दरम्यान संयुक्त कृतिगटाची चर्चा संपन्न
नवी दिल्ली, 22 जून (हिं.स) नवी दिल्ली येथे नुकतीच 12 व्या संयुक्त कृतिगटाने सीमा व्यवस्थापन आणि
 संयुक्त कृतिगट


नवी दिल्ली, 22 जून (हिं.स)

नवी दिल्ली येथे नुकतीच 12 व्या संयुक्त कृतिगटाने सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षा बाबींशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली . दोन दिवसांच्या चर्चेदरम्यान भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व दोन्ही देशांच्या गृह मंत्रालयातील संयुक्त सचिवांनी केले.

उभय देशांनी नेपाळमधील पोखरा येथे 10-11 फेब्रुवारी 2015 रोजी झालेल्या संयुक्त कृतिगटाच्या शेवटच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला. त्यांनी सीमेपलीकडील गुन्हेगारी कारवाया, सीमेवरील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे , सुरक्षेशी संबंधित विविध संस्थांचे सक्षमीकरण आणि क्षमता विकास , दहशतवादी आणि गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध/आळा घालणे या मुद्द्यांवरही चर्चा केली.

संयुक्त कृतीगटाने यापूर्वी झालेल्या सीमा जिल्हा समन्वय समितीच्या (BDCC) बैठकांचा आढावा घेतला तसेच परस्पर कायदेशीर सहाय्यता करार, प्रत्यार्पण करार आणि दोन्ही देशांमधील प्रलंबित सामंजस्य करारांच्या प्रगतीचा आढावा घेतला. नेपाळच्या शिष्टमंडळाने पुढील वर्षी नेपाळमध्ये होणाऱ्या पुढल्या संयुक्त कृतिगटाच्या बैठकीसाठी भारतीय शिष्टमंडळाला निमंत्रण दिले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande