' सरकार वारी पाटा' ऍमेझॉन प्राईमवर
हैदराबाद, 22 जून (हिं.स) दाक्षिणात्या सुपरस्टार महेश बाबू यांचा ' सरकार वारी पाटा' चित्रपट ऍमेझॉ
 सरकार वारी पाटा


हैदराबाद, 22 जून (हिं.स) दाक्षिणात्या सुपरस्टार महेश बाबू यांचा ' सरकार वारी पाटा' चित्रपट ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होण्यासाठी सिद्ध झाला आहे. उद्या, गुरुवार पासून ' सरकार वारी पाटा' ऍमेझॉन प्राईमवर तेलुगू, तमिळ, मल्याळम भाषेत इंग्रजी सह-शीर्षकांसह उपलब्ध होणार आहे. ' सरकार वारी पाटा' हा संपूर्ण मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांना ऍमेझॉन प्राईमवर बघता येणार आहे.

'सरकार वारी पाटा ' चित्रपट 12 मे 2022 ला भारतात आणि विविध देशात प्रदर्शित झाला. चित्रपटात महेश बाबू पोकरी प्रमाणे मास रूपात आहेत. या चित्रपटात ते वसुली दादा ची भूमिका साकारत असल्याचे समजते. सरकार वारी पाटाच्या माध्यमातून महेश बाबू आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री कीर्ती सुरेश पहिल्यांदा एकत्र आले आहेत . सरकार वारी पाटा चित्रपटात दिग्दर्शक परशूराम आणि महेश बाबू यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले. विजय देवरकोंडा यांच्या गीता गोविन्दम चित्रपटाने दिग्दर्शक परशूराम यांना देशव्यापी ख्याती आणि प्रसिद्धी प्राप्त झाली.

बँक आणि आर्थिक क्षेत्रात असलेल्या कथित भ्रष्ट कारभारावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. नायक महेश ला प्रिय असलेल्या कलावती या महिलेने फसवल्यानंतर, ते पैसे परत घेण्यासाठी अमेरिकेतून भारतात आल्यावर काय होते हे चित्रपटात दर्शवण्यात आले आहे. 'सरकार वारी पाटा ' नंतर महेश बाबू दिग्दर्शक एस एस राजमौली ही जोडी देखील लवकरच सोबत काम करणार आहे. यासोबत अतडु, कलेजा या चित्रपटानंतर दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास- महेश बाबू पुन्हा सोबत काम करणार आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande