रत्नागिरी : मिरजोळे येथे हातभट्टीची चोरटी दारू जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी, 22 जून, (हिं. स.) : मिरजोळे येथे पोलिसांनी ७२ हजाराची हातभट्टीची चोरटी दारू जप्त करून नष्
रत्नागिरी : मिरजोळे येथे हातभट्टीची चोरटी दारू जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा


रत्नागिरी, 22 जून, (हिं. स.) : मिरजोळे येथे पोलिसांनी ७२ हजाराची हातभट्टीची चोरटी दारू जप्त करून नष्ट केली. तसेच तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक राहुल पावसकर यांचे गोपनीय माहितीच्या आधारे आज सकाळी ७ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रत्नागिरीजवळच्या मिरजोळे गावी अवैध दारूधंद्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या कारवाईमध्ये गूळ, नवसागर मिश्रित ३६०० लिटर रसायन आणि साहित्य असा ७२ हजार रुपये किमतीचा माल नष्ट करण्यात आला. तसेच ४८ लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि दारू गाळण्याचे साहित्य तसेच तीन मोटारसायकल असा ८७ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अमोल सुधाकर पाटील, सुनीलभाई पाटील, संतोष अशोक सकपाळ (सर्व रा. पाटीलवाडी, मिरजोळे, ता. रत्नागिरी) यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेडी तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande