सातारा - जागतिक ऑलिंम्पिक दिन विविध उपक्रमांनी होणार साजरा
सातारा, 22 जून (हिं.स.) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशन व गुरुकुल एज्
सातारा - जागतिक ऑलिंम्पिक दिन विविध उपक्रमांनी होणार साजरा


सातारा, 22 जून (हिं.स.) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशन व गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, सातारा यांच्या विद्यमाने 23 जून हा जागतिक ऑलिंम्पक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली आहे.

जगभरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व खेळाकडे आकर्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीची स्थापना 23 जून 1894 रोजी करण्यात आली. दरवर्षी 23 जून हा दिवस जागतिक ऑलिंम्पिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त 23 जून 2022 रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सकाळी 9 वाजता खेळाडूची रॅली, क्रीडा विषयक प्रात्यक्षिके, क्रीडा विषयक कार्यशाळा, परिसंवाद, खेळाडूंचे सत्कार इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशन मार्फत प्रमाणपत्राचेही वाटप करण्यात येणार असल्याचे श्री. नाईक यांनी कळविले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande