हरिद्वारहून परतणाऱ्या वाहनाला अपघात, १० ठार, सात जखमी
लखनौ, २३ जून (हिं.स.) : उत्तर प्रदेशामधील पिलीभीत जिल्ह्यात हरिद्वारहून स्नान करून परतणाऱ्या भाविकां
Accident 


लखनौ, २३ जून (हिं.स.) : उत्तर प्रदेशामधील पिलीभीत जिल्ह्यात हरिद्वारहून स्नान करून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. चालकाला डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग ७३० वर गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते झाडावर आदळले. ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले. ही घटना गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालामूरमध्ये घडली आहे. हरिद्वारहून स्नान करून परतणाऱ्या १७ भाविकांनी भरलेली चारचाकी परतत होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जेथे अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयातून प्राथमिक उपचारानंतर दोघांना उपचारासाठी अधिकच्या उपचारांसाठी पुढील केंद्रात पाठवण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच पीलीभीतचे जिल्हा दंडाधिकारी पुलकित खरे आणि पोलिस अधीक्षक दिनेश पी हे मोठ्या पोलीस फौजफाट्यासह जिल्हा रुग्णालयात पोहोचले. जेथे प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

दरम्यान पीलीभीतच्या दुर्घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. तसेच, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत आणि बचावकार्य पुरविण्याचे आदेशही दिले आहेत. जखमींच्या उपचारासंदर्भातही त्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande