मुंबई, २३ जून (हिं.स.) : मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी आलोक सिंग यांनी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात २०२१-२२ या वर्षात संरक्षा सुधारण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट आणि अनुकरणीय प्रयत्नांसाठी पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना वार्षिक सुरक्षा पुरस्कार प्रदान केले.
पुरस्कार विजेतांमध्ये ८९ वैयक्तिक आणि रेल्वेच्या लोको पायलट, पॉइंट्समन, ट्रॅकमन, स्टेशन मास्तर, सुरक्षा सल्लागार इ. वेगवेगळ्या स्टीममधून निवडल्या गेलेल्या ६ गट सुरक्षा श्रेणींचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित रेल्वे संचालनासाठी संरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि मध्य रेल्वेमध्ये शून्य अपघाताचे लक्ष्य गाठण्यासाठी कोणत्याही स्वरूपाच्या असामान्य घटना/अपघात टाळण्याचे आवाहन केले.
हिंदुस्थान समाचार