डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध : पंतप्रधान
नवी दिल्ली, 23 जून (हिं.स) भारतीय जनसंघाचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री आणि जेष्ठ राजनेते डॉ श्
 पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 23 जून (हिं.स)

भारतीय जनसंघाचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री आणि जेष्ठ राजनेते डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे अभिवादन आणि स्मरण केले.

ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे पुण्यतिथीनिमित्त स्मरण. भारताच्या एकात्मतेसाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय प्रयत्नांसाठी प्रत्येक भारतीय त्यांचा ऋणी आहे. त्यांनी भारताच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम घेतले आणि एका मजबूत, समृद्ध राष्ट्राचे स्वप्न पाहिले. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande