नवी दिल्ली, 23 जून (हिं.स)
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी लक्झेंबर्गच्या जनतेला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ट्वीटरद्वारे डॉ सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले, माझे मित्र, परराष्ट्र व्यवहार मंत्री जीन एसेलबॉर्न, सरकार आणि लक्झेंबर्गच्या जनतेला राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा.भारत-लक्झेंबर्गचे संबंध सकारात्मक मार्गावर आहे हा विश्वास आहे.
हिंदुस्थान समाचार