डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांची भेट सन्मानाची बाब : इथियोपिया मंत्री एर्गोगी टेस्फेय
आदिस अबाबा, 23 जून (हिं.स) इथियोपियाच्या महिला आणि सामाजिक व्यवहार मंत्री एर्गोगी टेस्फेय यांनी परर
 एर्गोगी टेस्फेय


आदिस अबाबा, 23 जून (हिं.स)

इथियोपियाच्या महिला आणि सामाजिक व्यवहार मंत्री एर्गोगी टेस्फेय यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांच्या भेटीवर आनंद व्यक्त केला.

ट्वीटरद्वारे एर्गोगी म्हणाल्या , आदिस अबाबा येथील भारतीय दूतावासाच्या चॅन्सरी बिल्डिंग कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन समारंभात भारताचे माननीय परराष्ट्र मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांना भेटणे सन्मानाची बाब आहे. भारत- इथियोपिया देशांचे बंधुत्व आणि दीर्घकालीन भागीदारी आणखी मजबूत होईल.

डॉ सुब्रमण्यम जयशंकर

इथिओपियाच्या महिला आणि सामाजिक व्यवहार मंत्री एर्गोगी टेस्फेय यांना भेटून आनंद झाला. त्यांनी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद येथून शिष्यवृत्ती अंतर्गत पीएचडी केली. त्यांचे तेलुगु ऐकून छान वाटलं.

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी इथिओपिया अध्यक्ष साहले-वर्क झ्वेडे यांची देखील भेट घेतली तसेच स्वागतासाठी आभार मानले. यावेळी मान्यवरांनी शिक्षण, आरोग्य, गुंतवणूक आणि विकास भागीदारी यासह द्विपक्षीय सहकार्यावर चांगली चर्चा झाली तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर दृष्टीकोनांची देवाणघेवाण केली असे ट्वीटरद्वारे डॉ सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले.

यासोबत जयशंकर यांनी आदिस अबाबा येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. शिक्षण आणि रोजगार निर्मितीमध्ये भारतीयांची भूमिका वाखाणण्याजोगी आहे तसेच इथिओपियन समाजासाठी त्यांचे योगदान सर्वत्र ओळखले जाते. भारताचा ध्वज उंच फडकत ठेवल्याबद्दल आपले आभारी आहोत असे जयशंकर म्हणाले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande