कोविड लसीकरणाने पार केला 196.62 कोटी मात्रांचा टप्पा
नवी दिल्ली, 23 जून (हिं.स) :भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 196.62 (1,96,62,
कोविड लसीकरण


नवी दिल्ली, 23 जून (हिं.स) :भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 196.62 (1,96,62,11,973) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,54,44,218 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे. आतापर्यंत 3.60 (3,60,03,591) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

भारतातील रुग्णसंख्या सध्या 83,990 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.19% इतकी आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.60% झाला आहे. गेल्या 24 तासांत 10,972 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 4,27,36,027 झाली आहे. गेल्या 24 तासात 13,313 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात एकूण 6,56,410 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 85.94 (85,94,93,387) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.81% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.03% आहे.

केंद्र सरकारने सुमारे 193.53 (1,93,53,58,865) कोटी लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (मोफत) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. 12.39 (12,39,76,825) कोटी न वापरलेल्या उपयोगी मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande