गुवाहाटी : हॉटेलबाहेर तृणमूल कार्यकर्त्यांची निदर्शने
गुवाहाटी, 23 जून (हिं.स.) : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि ठाकरे कुटुंबियांच्या जिव्हाळ
हॉटेलबाहेर तृणमूल कार्यकर्त्यांची निदर्शने


गुवाहाटी, 23 जून (हिं.स.) : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि ठाकरे कुटुंबियांच्या जिव्हाळ्याचे प्रतिबिंब आसामच्या गुवाहाटी येथे दिसून आले. शिवसेनेतील बंडखोर आमदारांचे वास्तव्य असलेल्या हॉटेल रॅडिसन ब्ल्यूच्या बाहेर टीएमसी आमदारांनी निदर्शने केलीत. राज्यात पूरस्थिती असताना आसाम सरकरा आमदारांची बडदास्त ठेवण्यात मग्न असल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आज, गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास अचानकपणे हॉटेल रॅडिसन बाहेर घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे गोंधळ उडाला. कोणाताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेले पोलीस सतर्क झाले. आसाम सरकारविरोधात आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी त्वरीत ताब्यात घेण्यास सुरुवात केली. हॉटेलमध्ये शिरण्याचा आमचा इरादा नाही. मात्र, केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचे आसाममधील पूरस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांचे बंड वणव्यासारखे पसरले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या 46 वर पोहचली आहे. रामटेकचे शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांच्यासह 4 आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. आज आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार आज शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande