संस्कृत भारतीतर्फे विविध वयोगटांसाठी संस्कृत संभाषण वर्ग
ठाणे, 23 जून (हिं.स.) : संस्कृत भाषा व्यवहार भाषा करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या ‘संस्कृतभारती’ तर्फे
classes


ठाणे, 23 जून (हिं.स.) : संस्कृत भाषा व्यवहार भाषा करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या ‘संस्कृतभारती’ तर्फे विविध वयोगटांसाठी संस्कृत संभाषण वर्ग, संस्कृत बालकेंद्र, देववाणी परीक्षा, गीता शिक्षण केंद्र इत्यादि वर्ग चालवले जातात.

संस्कृत भारती कोकण प्रांतातर्फे ७-१२ या वयोगटातील मुलांसाठी जुलै महिन्यात संस्कृत बालकेंद्राचा उपक्रम सुरु होत आहे. हा उपक्रम मुलांसाठी निःशुल्क चालवण्यात येतो.

वर्षभर संस्कृत माध्यमातून चालणाऱ्या या बालकेंद्रात मुलांना संस्कृतचा हसत खेळत परिचय करून दिला जातो. श्लोक आणि सुभाषिते, कथा आणि गाणी यांद्वारे संस्कृत भाषा मुलांच्या कानावर पडते. शब्द परिचय आणि संभाषण अभ्यासामुळे मुले संस्कृतमधून परस्पर संवाद करू शकतात. जुलै महिन्यात ठाणे शहरात नौपाडा, पाचपाखाडी, श्रीरंग सोसायटी, मानपाडा, वसंत विहार अशा विविध ठिकाणी ‘संस्कृत बालकेंद्र’ सुरु होत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande