किचन कल्लाकारच्या सेटवर बोलका कोबी
मुंबई, 23 जून, (हिं.स.) : झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रे
किचन कल्लाकारच्या सेटवर बोलका कोबी


मुंबई, 23 जून, (हिं.स.) : झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात पण या आठवड्यात प्रेक्षकांना या कार्यक्रमात एक बोलका कोबी पाहायला मिळाला. हो हे खरं आहे. या आठवड्यात बुधवार-गुरुवार दोन दिवस रामदास पाध्ये या किचनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि त्यांच्यासोबत बोलके बाहुले पाहुणे येणार नाहीत असं होणं शक्यच नाही.

रामदास पाध्ये यांच्यासोबत एक बोलका कोबी या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रामदास पाध्ये यांनी एक खास सादरीकरण या किचनमध्ये प्रेक्षकांसाठी सादर झाले. रामदास पाध्ये यांच्या सोबत लोकप्रिय हास्यकवी अशोक नायगावकर आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande