ठाणे, 23 जून (हिं.स.) : भिवंडी येथील शासकीय वसतिगृहात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी 30 जून 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल आर.एन.बारापात्रे यांनी केले आहे.
विद्यार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागासवप्रवर्ग, अपंग, अनाथ, दारिद्र्यरेषेखालील असावा. पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा अनु. जातीसाठी रु.2.00 लाख, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी रु. 1.00 लाख अपंग व अनाथ यांच्यासाठी उत्पन्नाची मर्यादा नाही. अभ्यासक्रमाच्या शालेय विभाग इयत्ता 8 वी 12 वी व महाविद्यालयीन विभाग पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेले ऑफलाईन अर्ज भरु शकतील.
ऑफलाईन अर्जाची मुदत शालेय विद्यार्थ्यांसाठी 30 जून 2022 पर्यत असून इयत्ता आठवी ते बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) दि.1 जुलै 2022 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र.0251-25104 / 9423639104 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्रीमती बारापात्रे यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार