बुलडाणा : प्राप्त 616 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 07 पॉझिटिव्ह
बुलडाणा, 23 जून (हिं.स.) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपै
बुलडाणा : प्राप्त 616 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 07 पॉझिटिव्ह


बुलडाणा, 23 जून (हिं.स.) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 623 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 616 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 07 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपिड चाचणी मधील अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोग शाळेतील 15 तर रॅपिड टेस्टमधील 601 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 616 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर :2, चिखली तालुका : सावरगाव डुकरे 1, बुलडाणा तालुका : मढ 1, दे.राजा शहर :2, परजिल्हा: भोकरदन 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 07 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे.

त्याचप्रमाणे आजपर्यंत 815159 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98335 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98335 आहे. आज रोजी 109 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 815159 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 99058 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98335 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचा उपचार घेत असलेला 35 रूग्ण आहे. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande