ठाणे - माजिवडा मानपाडा प्रभागातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई
ठाणे, २३ जून, (हिं.स): ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु अ
माजिवडा मानपाडा प्रभागातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई


ठाणे, २३ जून, (हिं.स): ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.

माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत पानखंडा ओवळा येथील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या ठिकाणी ओंकार पावसकर यांचे ६० X ३० चौ. फुट मोजमापाचे पेटक्लिनीकचे अनधिकृत बांधकामात श्वान पालन केंद्र होते. या कारवाई वेळी सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे महेश आहेर, सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील उपस्थित होते.

सदरची कारवाई करण्यापूर्वी सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिरोडकर यांनी आपल्या पथकासह कारवाईच्या ठिकाणी उपस्थित राहुन या श्वान केंद्रातील १७ श्वान आपल्या पथकाच्या सहाय्याने ताब्यात घेतले व बांधकाम तोडक कारवाईसाठी मोकळे करुन दिले. त्यानंतर या कारवाईस उपस्थित अधिका-यांनी या पेटक्लिनीकच्या बांधकामाच्या आतील भागाची पाहणी केली. सदरच्या पाहणीचे जनसंपर्क विभागातील छायाचित्रकारामार्फत चित्रीकरण करण्यात आले. बांधकाम संपुर्णतः रिकामे आहे याची खातरजमा केल्यानंतर सदरच्या पेटक्लिनीकचे बैठे व पक्के अनधिकृत बांधकाम व या बांधकामालगत रामनिवास जगदेव चौधरी यांनी केलेले ४० X ३० बैठे अनधिकृत बांधकाम ही दोन्ही अनधिकृत बांधकामे जेसीबी मशिनच्या सहाय्याने निष्कासीत करण्यात आली. ही अनधिकृत बांधकामे निष्कासीत करण्यापूर्वी यासंबंधीची DPL पुर्ण करण्यात आलेली होती..

सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त, (अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभाग ) महेश आहेर यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांनी अतिक्रमण विभागातील अधिकारी. कर्मचारी, ठेकेदाराची वाहने, मनुष्यबळ यांचे सहाय्याने कासारवडवली पोलीस स्टेशनकडील उपलब्ध पोलीस बंदोबस्तात केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande