पंतप्रधान नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा
नवी दिल्ली, 2 जुलै (हिं.स) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 2 जुलै (हिं.स) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.डिसेंबर,2021 मध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा, उभय नेत्यांनी आढावा घेतला. विशेषत: कृषी उत्पादने, खते आणि औषध उत्पादनांच्या द्विपक्षीय व्यापाराला आणखी प्रोत्साहन कसे देता येईल यावर त्यांनी विचार विनिमय केला.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा आणि खाद्यपदार्थ बाजारपेठेच्या स्थितीसह जागतिक समस्यांवर देखील उभय नेत्यांनी चर्चा केली.युक्रेनमधील सद्य परिस्थिती संदर्भात,पंतप्रधानांनी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूने भारताच्या दीर्घकालीन भूमिकेचा पुनरुच्चार केला. जागतिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर नियमित सल्लामसलत करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

इस्रायल पंतप्रधान यायर लॅपिड

इस्रायलचे पंतप्रधान पद स्वीकारल्याबद्दल यायर लॅपिड यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, इस्रायलचे पंतप्रधानपद स्वीकारल्याबद्दल महामहिम यायर लॅपिड यांना हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन.आपण दृढ राजनैतिक संबंधांची 30 वर्षे साजरी करत असताना आपली धोरणात्मक भागीदारी पुढे चालू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे. भारतासोबत खरी मैत्री निभावल्याबद्दल महामहिम नफ्ताली बेनेट यांचे धन्यवाद. आपल्या फलदायी चर्चा माझ्या स्मरणात राहतील आणि तुम्हाला नवीन भूमिका बजावताना यश मिळावे यासाठी शुभेच्छा.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande