श्रीलंकेतील भारतीय व्यावसायिकांना 5 वर्षांचा व्हिसा प्रदान
कोलंबो, 3 जुलै (हिं.स) श्रीलंकेचे मंत्री धम्मिका परेरा यांनी श्रीलंकेतील भारतीय व्यावसायिकांना 5
भारतीय व्यावसायिक


कोलंबो, 3 जुलै (हिं.स)

श्रीलंकेचे मंत्री धम्मिका परेरा यांनी श्रीलंकेतील भारतीय व्यावसायिकांना 5 वर्षांचा व्हिसा प्रदान केला आहे. श्रीलंकेतील व्यवसाय सुलभ करण्यासाठी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी हे स्वागतार्ह पाऊल आहे अशा शब्दात भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने आनंद व्यक्त केला.

नुकतेच भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले यांनी व्यापार मंत्री नलिन फर्नांडो यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मान्यवरांनी द्विपक्षीय व्यापाराच्या विविध पैलूंवर चर्चा केली. व्यापाराचे प्रमाण वाढवणे आणि दोन्ही देशादरम्यान व्यावसायिक संबंध सुलभ करण्यासाठी तंत्र आणि प्रणाली तयार करणे यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande