अमरनाथ यात्रा : महाराष्ट्रातील भाविक दरीत कोसळला
सैन्याच्या बचाव पथकाने रुग्णालयात दाखल केले श्रीनगर, 04 जुलै (हिं.स.) : अमरनाथ यात्रेला गेलेले महार
अमरनाथ यात्रा : महाराष्ट्रातील भाविक दरीत कोसळला


सैन्याच्या बचाव पथकाने रुग्णालयात दाखल केले

श्रीनगर, 04 जुलै (हिं.स.) : अमरनाथ यात्रेला गेलेले महाराष्ट्रातील एक भाविक खेचरासह दरीत कोसळल्याची घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या या भाविकाचे नाव सत्यनारायण तोष्णेयार असून ते अकोला येथील रहिवासी आहेत. सैन्याच्या बचाव पथकाने त्यांना दरीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलेय.

महाराष्ट्राच्या अकोला येथील सत्यनारायण तोष्णेयार (वय 50) आपल्या पत्नी आणि मुलासह अमरनाथ यात्रेला गेले होते. देवदर्शन करून खेचरावर बसून परतताना बारारी मार्गावर खेचराचा तोल जाऊन ते खेचरासह 100 फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. दरम्यान भारतीय लष्कराच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत त्यांना बारारीमार्गे सैन्य दलाच्या शिबिरात हलवले. त्याठिकाणाहून त्यांना उपचारासाठी श्रीनगरला नेण्यात आल्याची माहिती संरक्षण दलाच्या जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande