श्रीलंकेविरुद्धच्या महिला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताची 2-0 ने विजयी आघाडी
नवी दिल्ली, ४ जुलै (हिं.स.) : भारताच्या महिला संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमान श्रीलंक
श्रीलंकेविरुद्धच्या महिला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताची 2-0 ने विजयी आघाडी


नवी दिल्ली, ४ जुलै (हिं.स.) : भारताच्या महिला संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमान श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला व 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. रेणुका सिंगची भेदक गोलंदाजी, स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारताच्या महिला संघाने हा विजय मिळवला. रेणुका सिंहच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे तिला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले. यापूर्वी झालेल्या टी-20 मालिकेचेही विजेतेपद मिळवले होते.

सोमवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीत रेणुका सिंगच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव 50 षटकांत 173 धावांवर संपला. त्यांच्याकडून अमा कंचनाने सर्वाधिक नाबाद 47 धावा केल्या. नीलाक्षी डीसिल्व्हाने 32, चामरी अटापट्टूने 27 तर अनुष्का संजीवनीने 25 धावा केल्या. त्यानंतर भारताने 25.4 षटकांत बिनबाद 174 धावा केल्या. विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना भारताच्या स्टार फलंदाज स्मृती मानधना व शेफाली वर्मा यांनी सहजसुंदर फलंदाजी केली. या दोघींनी श्रीलंकेच्या एकाही गोलंदाजाला संधीच दिली नाही. त्यांनी 26 व्या षटकात भारताचा एकही बळी न गमावता 174 धावांची अखंडित भागीदारी व सलामी देत विजय साकार केला. स्मृती मानधना नाबाद 94, शेफाली वर्मा नाबाद 71 धावा केल्या. रेणुका सिंगने 28 धावांत 4 बळी घेतले. मेघना सिंग व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande