नाशिक : जलतरण खेळाच्या प्रशिक्षण व संघ उभारणीसाठी 12 जुलैला निवड चाचणीचे आयोजन
नाशिक, 04 जुलै, (हिं.स.) : शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी,
नाशिक : जलतरण खेळाच्या प्रशिक्षण व संघ उभारणीसाठी 12 जुलैला निवड चाचणीचे आयोजन


नाशिक, 04 जुलै, (हिं.स.) : शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथे जलतरण खेळाच्या प्रशिक्षण व संघ उभारणीसाठी नव्याने खेळाडूंची भरती करण्यात येणार आहे. या चाचणीकरीता खेळाडूंची निवड 12 जुलै रोजी सकाळी 8.00 वाजता निवडचाचणीद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, जलतरण खेळाच्या प्रशिक्षण व संघ उभारणीसाठी पुणे, मुंबई, नाशिक, लातूर, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या सर्व विभागातील 08 ते 16 वर्षखालील खेळाडूंना सहभाग घेता येणार आहे. या निवड चाचणीकरीता मानके निश्चित करण्यात आली असून यामध्ये कौशल्य चाचणीच्या वेळी खेळाडू किमान राज्यस्तरावर सहभागी व स्पर्धेत प्राविण्य प्राप्त असणे आवश्यक आहे. तसेच खेळाडूची उंची, शारिरीक क्षमता, कौशल्य चाचणी, खेळातील कामगिरी, जलतरण चाचणीत 14 वर्षाआतील खेळाडूंसाठी 50 मीटर फ्री स्टाईल, 100 मीटर मेन स्ट्रोक, 400 मीटर फ्री स्टाईल व 14 वर्षापुढील खेळाडूंसाठी 800 मीटर फ्री स्टाईल, 800 मीटर धावणे, शोल्डर लेंन्थ याप्रमाणें निकष असणार आहेत.

या निवड चाचणी करीता फक्त खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार असून प्रवास व भोजन खर्च खेळाडूंना स्वत: करावा लागणार आहे. तसेच चाचणीत सहभाग घेण्यासाठी खेळाडूंनी जन्मतारखेचा दाखला सादर करणे बंधनकारक असणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी जलतरण क्रीडा मार्गदर्शक बालाजी केंद्रे यांच्या 9503548988 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande