आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेत करार
मॉन्ट्रियल, 28 सप्टेंबर (हिं.स)मॉन्ट्रियल येथे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO)
नागरी विमान वाहतूक


मॉन्ट्रियल, 28 सप्टेंबर (हिं.स)मॉन्ट्रियल येथे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) 42 व्या अधिवेशनांसोबत आयोजित केलेल्या समारंभात,आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (ICAO),यांच्यात भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री,ज्योतिरादित्य सिंधिया,फ्रान्सचे परिवहन मंत्री क्लेमेंट ब्यूने, आणि आयसीएओ परीषदेचे अध्यक्ष साल्वाटोर सियाचिटानो यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या सामंजस्य करारावर आयसीएओचे सरचिटणीस महामहीम जुआन कार्लोस सालाझार आणि आयएसएचे ऑपरेशन्स प्रमुख जोशुआ वायक्लिफ यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

मे 2022 मध्ये मॉन्ट्रियलच्या आपल्या भेटीदरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (ICAO) ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) या संस्थेची भागीदार संस्था बनण्याची संकल्पना आयसीएओच्या अध्यक्षांसोबतच्या झालेल्या बैठकीत मांडली होती.चारच महिन्यांच्या कालावधीत,या सामंजस्य करारावर सहमती झाली आणि ती पूर्ण झाली.भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष महामहीम फ्रँकोइस ओलांद यांनी 2015 मध्ये पॅरिसमधील COP -21 परीषदेच्या वेळी या धाडसी उपक्रमाचा पाया घातला होता; त्याचीच परीणीती भारत आणि फ्रान्सच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य करारामुळे आता झाली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक संस्थांसह या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये 121 स्वाक्षरीदार देशांचा आणि 32 भागीदार संघटनांचा समावेश आहे.ही आघाडी जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी कार्य करते.एलडीसी (LDCs) आणि एस आयडीसी(SlDCs) मधील प्रभावावर विशेष लक्ष केंद्रित करून सदस्य देशांना अक्षय ऊर्जा वापरण्यासाठी किफायतशीर आणि परिवर्तनीय उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी आयएसए(ISA) प्रयत्नशील आहे.

भारताने COP- 26 मध्ये 2070पर्यंत मध्ये नेट झिरो कार्बनच्या उद्दिष्ट गाठण्याची प्रतिज्ञा केली आहे.हा दृष्टीकोन मानव-केंद्रित असून ही प्रतिज्ञा आदर आणि राष्ट्रीय मालकी तत्त्वांवर आधारित, आहे तसेच सर्वांसाठी समान या तत्वाशी वचनबद्ध आहे.भारताने 2022 पर्यंत 175 GW इतकी अक्षय ऊर्जा स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे; त्यापैकी 100 GW सौर ऊर्जा असेल आणि 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन तीव्रतेत 33-35% घट होईल, जेणेकरून सौर ऊर्जेने सर्वात जास्त गावे जोडली जातील आणि ती सर्व समुदायांपर्यंत पोहोचू शकेल. भारतातील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हा 2015 मध्ये जगातील पहिले पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारे विमानतळ बनला आहे.

भारताने, फ्रान्सच्या पाठिंब्याने सौर प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विविध राष्ट्रांना आमंत्रित केले आहे.या युतीने एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली असून पोहोचण्यास कठीण आणि दुर्गम भागातील समुदायांसाठी अधिक परवडणाऱ्या किंमतीत सौर उर्जा तयार करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत.

आयसीएओ (ICAO) विमान वाहतूक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी त्याच्या अनेक उपक्रम आणि उद्दिष्टांद्वारे वचनबद्ध आहे.या उदात्त उपक्रमात,आयएसए (ISA) आणि आयसीएओ (ICAO) मधील या सामंजस्य कराराद्वारे भागीदारी करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी येऊ शकली नसती, कारण यामुळे सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी राज्यांची क्षमता विकसित करण्याच्या दिशेने सुरू करण्याच्या विविध प्रकारच्या प्रकल्पांना चालना मिळेल.माहिती देणे, महत्त्व समजावून सांगणे, क्षमता निर्माण करणे आणि प्रकल्पाचे प्रात्यक्षिक सादर करणे यासाठी ती कार्य करेल.यामुळे सर्व सदस्य राज्यांच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील सौरउर्जेचे सक्षमीकरण होईल.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande