आयएनएस सुनयना सेशेल्स येथील संयुक्त सागरी दलाच्या सरावात सहभागी
सेशेल्स, 28 सप्टेंबर (हिं.स.) : आयएनएस सुनयना ही भारतीय युद्धनौका दिनांक 24 ते 27 सप्टेंबर या कालावध
INS Sunayana 


INS Sunayana 


सेशेल्स, 28 सप्टेंबर (हिं.स.) : आयएनएस सुनयना ही भारतीय युद्धनौका दिनांक 24 ते 27 सप्टेंबर या कालावधीत सेशेल्स येथे संयुक्त सागरी दलांच्या (कम्बाइंड मेरीटाइम फोर्सेस) दक्षिण क्षेत्र सुसज्जता मोहिमेने (ऑपरेशन सदर्न रेडिनेस) आयोजित केलेल्या क्षमता विकसित करण्याच्या सरावात सहभागी झाली होती.

अमेरिकेचे व्हाइस ऍडमिरल ब्रॅड कूपर यांनी या संयुक्त सागरी सरावाच्यावेळी भारतीय नौदलाचे स्वागत केले. भारतीय नौदलाच्या युद्धनौकेची अशाप्रकारच्या संयुक्त सागरी सरावात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सहभागी देशांच्या प्रतिनिधींच्या चर्चासत्रांत भारतीय नौदलातर्फे सागरी क्षेत्रातील जागरूकता या विषयावर प्रशिक्षण व्याख्यान आयोजित केले होते.सेशेल्स स्पेशल फोर्सेसच्या नेतृत्वाअंतर्गत भारतीय नौदल समूहाच्या सहभागासह एचएमएस माॅन्ट्रोझ (HMS Montrose) या जहाजाच्या शोधभेटीचे आणि ती ताब्यात घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या कारवाई संदर्भातील थेट प्रात्यक्षिक देखील यावेळी आयोजित करण्यात आले होते.

सेशेल्स प्रजासत्ताकचे अध्यक्ष वावेल रामकलावान आणि सीएमएच्या सदस्य देशांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक प्रतिष्ठित मान्यवरांसमोर प्रात्यक्षिकाचे सादरीकरण झाले पाहिले.या संयुक्त सरावात भारतीय नौदलाच्या सहभागाची खूप प्रशंसा करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande