जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक : पंतप्रधान
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर (हिं.स) :इटलीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत फ्रेटेली डी इटालिया पक्षाच्
जॉर्जिया मेलोनी


नवी दिल्ली, 28 सप्टेंबर (हिं.स) :इटलीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत फ्रेटेली डी इटालिया पक्षाच्या विजयाबद्दल, जॉर्जिया मेलोनी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले.

ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, इटलीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाला विजय मिळवून दिल्याबद्दल जॉर्जिया मेलोनी यांचे अभिनंदन. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत. असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande