पुणे : रसिकांनी अनुभविला हिंदी सुफी गीतांचा नजराणा
पुणे 30 सप्टेंम्बर (हिं.स) : मेरा इश्क सुफीयना...सजदा तेरा सजदा... दिल दिया गल्ला...पिया रे पिय
पुणे : रसिकांनी अनुभविला हिंदी सुफी गीतांचा नजराणा


पुणे 30 सप्टेंम्बर (हिं.स) : मेरा इश्क सुफीयना...सजदा तेरा सजदा... दिल दिया गल्ला...पिया रे पिया रे... लंबी जुदाई, चार दिनों का प्यार हो रब्बा... मितवा, कहे धडकने तुझसे क्या...मेरे रश्के कमर.. यांसारख्या हिंदी चित्रपटातील नावाजलेल्या गीतांसह भर दो झोली मेरी या मुहम्मद अली...दमादम मस्त कलंदर सारख्या कव्वालीपर्यंत एकाहून एक सरस गाण्यांनी ‘सजदा’ या कार्यक्रमामध्ये हिंदी सुफी गीतांचा अनमोल नजराणा उलगडला. गायक आशिष देशमुख, विवेक पांडे, विनल देशमुख व राधिका अत्रे यांनी सादर केलेल्या प्रत्येक गीताला भरभरुन दाद देत रसिकांनी हिंदी सुफी संगीतातील अविष्कार अनुभविले. यावेळी संदीप पंचवाटकर यांनी बहारदार निवेदन करुन सुफी संगीताचा माहिती देत शाहीरी सादर करुन श्रोत्यांची दाद मिळविली.

पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे शारदीय नवरात्रौत्सवनिमित्त गणेश कला क्रिडा रंगमंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ‘सजदा’ हा हिंदी सुफी गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. गोंविद कुडाळकर (तबला), राजन साळवी (ढोलक), असिफ इनामदार (अॅक्टोपॅड), प्रथमेश लाड (बासरी), हार्दीक रावल (गिटार), सईद खान (सिंथेसायझर) या कलाकारांनी साथसंगत केली. या सर्व कलाकारांचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कलाकारांनी नावजलेल्या प्रेम गीते, कव्वाली व एकाहून एक सरस गीते गायकांनी सादर करुन सुफी गीतांचा नजराना पुणेकरांसमोर उलगडला. हिरे मोती मै ना चाहू, तेरे बिन जिया नही लगदा.. तेरी याद साथ है... तुम जो आये जिंदगी मे... यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी यांसारख्या हिंदी सुफी गीतांमध्ये सुरात सूर मिसळून रसिकांनी देखील मैफलीचा आनंद घेतला. नयनो की मत सुनीये.. हे आशिषकुमार देशमुख यांनी सादर करुन श्रौत्यांची वन्समोअरची दाद दिली. गुलजार यांनी लिहिले सुफी गाणी व निवेदकांनी सादर केलेल्या शायरीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यात आले. प्रेम व विरहाची सुफी गाण्यातून प्रेमाची भावना उलगडणारे गीताला श्रोत्यांनी वन्समोअरची दाद देत कार्यक्रमात रंग भरला होता. लंबी जुदाई गझल, कव्वाली आणि हिंदी सुफी संगीताच्या सादरीकरणाने उत्तरोत्तर हा ‘सजदा’ कार्यक्रम रंगत गेला. जग घुमा घुमा... तैनू इतना.. चन्ना मेरे या हे गीते गायकांनी सादर करुन श्रोत्यांची वाहवा मिळविली. तुम जो आये जिंदगी मे आशिष आणि राधिक यांनी सादर केलेल्या गीतला वन्समोअर मिळाला. सुर सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायिलेले ‘ए मेरे वतन के लोगो’ राधिका अत्रे यांनी सादर करुन लता दीदींना श्रद्धांजली अर्पण केली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वंदे मातरम हे देशभक्तीपर गीत कलाकारांनी सादर करुन कार्यक्रमाचा समारोप केला. रोज सायंकाळी सात वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गणेश कला क्रीडारंगमंच येथे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande