ब्रिटिश खासदार बिलिमोरियांनी काढले पंतप्रधान मोदींसह भारताविषयी गौरवोद्गार
लंडन, २२ जानेवारी (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वांत शक्तिशाली व्यक्ती आहेत. सोबतच भार
ब्रिटिश खासदार बिलिमोरिया पंतप्रधान मोदी


लंडन, २२ जानेवारी (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वांत शक्तिशाली व्यक्ती आहेत. सोबतच भारत ही जगात तेजीने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, अशा शब्दांत ब्रिटिश खासदार लॉर्ड करन बिलिमोरिया यांनी संसदेत पंतप्रधान मोदी आणि भारत यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. खासदार बिलिमोरिया यांचे भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

येणाऱ्या काळात भारत यूकेचा सर्वांत जवळचा मित्र असायला हवा!

संसदेत केलेल्या या भाषणात त्यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदी यांनी त्यांच्या वडिलांसोबत गुजरात स्टेशनवर चहा विकला. आज ते सर्वांत ताकदवान व्यक्ती आहेत. भारत हा येणाऱ्या काळात यूकेचा सर्वांत जवळचा मित्र असायला हवा. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असून, भारत एक युवा देश आहे. गेल्या वर्षी भारताचा विकास दर ८.७ टक्के इतका होता. यावरून भारत प्रगतीशील असल्याचेही ते म्हणाले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande