अकोला : प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी
नागपूर नंतर अकोल्यातही वाद चव्हाट्यावर अकोला, १७ ऑक्टोबर(हिं.स.) : अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीतील अ
photo


नागपूर नंतर अकोल्यातही वाद चव्हाट्यावर

अकोला, १७ ऑक्टोबर(हिं.स.) : अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीतील अंतर्गत वाद काही नवीन नाही. आधीच गटातटात विभागलेल्या जिल्ह्यातील काँग्रेस मधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेस पदाधिकारी अभय पाटील आणि प्रदेश सरचिटणीस मदन भरगड यांच्यात फोटो काढण्यावरून हा वाद झाल्याचे समजते. अकोल्यातील विश्रामगृह येथे काँग्रेसने पिकविम्यावरून पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेनंतर हा वाद झाला आहे.

अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत खदखद वाढली असून पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण केले जात आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमधील असंतोषामुळे पक्ष अधिक कमकुवत होत आहे. अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी, पक्षांतर्गत खदखद, डावलणे, नाराजी आदी प्रकार काही नवीन नाहीत. त्यामुळेच एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या अकोला जिल्ह्यात काँग्रेस दोन दशकांपासून रसातळाला गेली आहे. आता हाच वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पत्रकार परिषद आटोपताच काँग्रेसच्या दिग्गज पदाधिकाऱ्यांमध्ये हा वाद झाला आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अकोल्यातील विश्राम गृहात पिकविम्याच्या मागणीवरून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान पत्रकार परिषद झाल्यानंतर माजी महापौर प्रदेश सचिव मदन भरगड आणि प्रदेश सरचिटणीस डॉ. अभय पाटील यांच्यात हा जोरदार बाचाबाची झाली आहे. या दोघांमध्ये फोटो काढण्यावरून हा वाद झाल्याचे समजते. त्यानंतर दोघांतील वाद पत्रकारांसमोरच झाल्याने या वादाची जोरदार चर्चा सुरू होती

नेमकं काय घडले :- जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेनंतर सरचिटणीस डॉ. अभय पाटील आणि प्रदेश महासचिव मदन भरगड यांच्यात फोटो काढतांना उभे राहण्याच्या जागेच्या कारणावरून वादा झाला. या वादातून दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यावेळी पत्रकारांसह काँग्रेसचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. वाद झाल्यानंतर डॉ. अभय पाटील हे हॉल मधून धावत ते त्यांच्या गाडीकडे धावत गेले. यावेळी काही पत्रकार व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली. डॉ. अभय पाटील यांच्या मागेच मदन भरगड हेसुद्धा बाहेर आलेत व त्यांनी आत घडलेल्या प्रकार माध्यमांपुढे कथन केला.

नागपूर नंतर अकोल्यातही वाद :- पाच दिवसांपूर्वी नागपूरात कॉग्रेसची बैठक सुरू असताना दोन नेत्यांमधील वादाचं रुपांतर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर अकोल्यातही काँग्रेस मधील प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यातील वाद पत्रकार परिषदेतच घडला आहे. आधीच गटातटात विभागलेल्या जिल्ह्यातील काँग्रेस मधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. आज झालेल्या या वादाची जोरदार चर्चा रंगली आहे.

काँग्रेसच्या बैठकीत उमेदवारीला विरोध म्हणून वाद?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कडून डॉ. अभय पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र डॉ. पाटील हे गेल्या पाच वर्षात पक्षात सक्रिय नसून त्यांच्या उमेदवारीला नाव न घेता मदन भरगड यांनी विरोध केल्याची माहिती आहे. आणि याच कारणावरून आजचा वाद झाल्याचे बोललं जात आहे. या वादानंतर डॉ. अभय पाटील हे हॉल मधून धावत ते त्यांच्या गाडीकडे धावत गेले. त्यावेळी त्यांनी गाडीत ठेवलेली पिस्टल काढण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र असं काहीही केलं नसल्याचं डॉ. अभय पाटील यांनी म्हटलं आहे. मी गाडीत बसून तिथून निघून गेल्याचे पाटील म्हणाले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande