नाशिक, १९ नोव्हेंबर (हिं.स.) - अक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा दावा करून कृषी अधिकारी असलेल्या महिला व तिच्या मुलाने दिंडोरी येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्राच्या गंगापूर रोड येथील विश्वस्ता कडे दहा लाख रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
याबाबत सविस्तर माहिती देताना नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकचे पोलीस उपयुक्त किरण कुमार चव्हाण यांनी रविवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की दिंडोरी येथील स्वामी समर्थ अद्याप अध्यात्मिक सेवा केंद्राच्या नासिक येथील गंगापूर रोड वरती असलेला केंद्रामध्ये विश्वस्त म्हणून कार्यरत असलेले निंबा मोतीराम शिरसाट यांच्याकडे 2014 पासुन याच केंद्रामध्ये केंद्र व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या सारिका बाबुराव सोनवणे या कृषी अधिकारी पदावरती काम करणाऱ्या महिलेची ओळख झाली या महिलेचे पती बापुराव सोनवणे यांचे सन 18-19 ला निधन झालेले आहेत आणि सारिका बापुराव सोनवणे या आपल्या मुलासह या केंद्राच्या जवळच असणा-या सोसायटीमध्ये राहतात त्यांनी सातत्याने निंबा मोतीराम शिरसाट यांच्याशी असलेला ओळखीचा फायदा घेऊन प्रथमदर्शनी हात उसने पैसे मागितले त्यानंतर माझ्याकडे अक्षेपार्य व्हिडिओ आहे. अशी धमकी देऊन सातत्याने सारिका बापूराव सोनवणे यांनी आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संकल्प सिद्धी नावाची कंपनी पैसे डबल करून देते असे आम्हीच दाखवून पैसे उकळायला सुरुवात केली. त्यानंतर जानेवारी 23 पासून सोनवणे यांनी निंबा शिरसाठ यांच्याकडे व्हिडिओ चे नाव सांगून सातत्याने खंडणी मागितली आतापर्यंत शिरसाठ यांनी सारिका सोनवणे यांना सुमारे एक कोटी पाच लाख रुपये इतकी खंडणी दिली असून या प्रकरणाला सातत्याने वैतागून शिरसाठ यांनी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये माहिती दिली.
पुढे माहिती देताना पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांनी सांगितले की काल शनिवारी पुन्हा सारिका सोनवणे यांनी शिरसाट यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली होती आणि ती रक्कम स्वीकारताना जेहान सर्कल येथे खंडणी घेताना सारिका सोनवणे आणि तिचा मुलगामोहित सोनवणे या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे पोलिसांनी या महिलेचे लॅपटॉप मोबाईल व इतर साहित्य जप्त केले असून या व्हिडिओच्या आधारे त्रास दिला जात होता त्याची सत्यता देखील तपासली जाणार आहे असे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे या खंडणी विरोधी पथकाच्या साह्याने करीत आहे.
हिंदुस्थान समाचार