नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर (हिं.स.) : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी आज भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक केले.
विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यापुर्वीचे सर्व सामने जिंकले. त्यानंतर अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले.
प्रिय टीम इंडिया,
विश्वचषक स्पर्धेत तुमची कामगिरी आणि जिद्द वाखाणण्याजोगी होती. तुम्ही उत्तम खेळ करत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली.
आम्ही आज आणि सदैव तुमच्या सोबत आहोत.
हिंदुस्थान समाचार