मुंबई, १९ नोव्हेंबर (हिं.स.) : विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. त्यानिमित्ताने गुगलने देखील खास डुडल तयार केले आहे.
ही आहेत वैशिष्ट्य
या डुडलमध्ये गुगलने पिच, स्टंप्ससह क्रिकेटच्या मैदानाचे दृश्य दाखवले आहे. सीमारेषा, प्रेक्षक, आकाश आणि फटाक्यांची आतषबाजी हे देखील त्यात दाखवले आहे. त्यासोबतच आकाशही दाखवण्यात आले आहे. वेगळ्या स्टाईलने क्रिकेटचे साहित्य वापरून गुगल लिहिण्यात आले आहे.
गुगल डुडल नीट पाहिलं तर लक्षात येईल की, वर्ल्डकप ट्रॉफी गुगलच्या दुसऱ्या O मध्ये दिसत आहे, तर गुगल शब्दात L च्या जागी बॅटने घेतली आहे. गुगल डुडलवर क्लिक करताच गुगल तुम्हाला एका नव्या पेजवर घेऊन जातो, जिथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या फायनल मॅचशी संबंधित प्रत्येक छोटी-मोठी माहिती मिळेल.
दोन्ही संघांत आतापर्यंत एकूण १५० सामने
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाप्रमाणेच भारतानेही आपल्या समोरच्या प्रत्येक संघावर वर्चस्व गाजवत असल्याचे यावेळी दिसून आले. एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघ आतापर्यंत एकूण १५० वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने ५७ आणि ऑस्ट्रेलियाने ८३ सामने जिंकले आहेत. या दोघांमध्ये विश्वचषकाचे १३ सामने झाले. त्यात भारताने पाच, तर ऑस्ट्रेलियाने आठ वेळा विजय मिळवला आहे.
हिंदुस्थान समाचार