दिशा परिवारातर्फे राजापूरचा आगळावेगळा स्नेहमेळावा उत्साहात
रत्नागिरी, 20 नोव्हेंबर, (हिं. स.) : पुणे येथील दिशा परिवारातर्फे राजापूर तालुक्यातील शिष्यवृत्तीधार
दिशा परिवारातर्फे राजापूरचा आगळावेगळा स्नेहमेळावा उत्साहात


रत्नागिरी, 20 नोव्हेंबर, (हिं. स.) : पुणे येथील दिशा परिवारातर्फे राजापूर तालुक्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पालक आणि मदतीचा हात देणारे दाते यांनी स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून एकत्रितरीत्या दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

कणकवली येथील साहित्यिक सरिता पवार यांनी ओणी येथील वात्सल्य मंदिरचे संचालक रूपेश गीता रामचंद्र यांची मुलाखत यावेळी घेतली. त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास सार्यांसमोर उलगडला. रूपेश यांनी आपण निवडलेल्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचा सल्ला दिला.

दिशा परिवाराचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरचे समन्वयक गजानन जोशी, अनंत रानडे आणि बी. के. गोंडाळ यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रकाश भावे, जगदीश पवार, संदीप देशपांडे, अनिल ठाकुरदेसाई, अनिता ठाकुरदेसाई, प्रकाश कातकर, संदीप मालपेकर, मोहन पाडावे, नीलिमा गोरे, शैलेश आंबेकर, अजित हर्डीकर, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसह पालक, दाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिशा परिवाराच्या कविताचे वाचन आकांक्षा जोशी यांनी केले. जी. आर. कुलकर्णी, डॉ. महेंद्र मोहन, प्रा. अभिजित घागरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सानिया नाईक, संतोष तरळ, दक्षिणा गुरव या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande