रत्नागिरी, 20 नोव्हेंबर, (हिं. स.) : मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे मंगळवारी, दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मनशक्ती प्रयोग केंद्राचे मार्गदर्शन श्रीराम मंदिरात करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला नागरिकांनी सायंकाळी पावणेचार वाजता उपस्थित राहावे आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य संयोजक अण्णा लिमये आणि सुरेंद्र घुडे यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार