सिंधुदुर्गात गॅरेजमध्ये तरुणाची आत्महत्या
सिंधुदुर्ग, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील मयुरेश प्रकाश मेस्त्री (२४) या त
सिंधुदुर्गात गॅरेजमध्ये तरुणाची आत्महत्या


सिंधुदुर्ग, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील मयुरेश प्रकाश मेस्त्री (२४) या तरुणाने ओसरगाव गवळीवाडी येथे एका हॉटेलनजिक सुरू केलेल्या गॅरेजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना आज सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

मयुरेश मेस्त्री याने ओसरगाव येथे एका हॉटेलच्या बाजूला आपला गॅरेज व्यवसाय सुरू केला आहे. नेहेमीप्रमाणे तो गॅरेज मध्ये आला होता. मात्र दुपारी १२ वा. च्या दरम्याने नेहेमीप्रमाणे गाळे मालक यांचा मुलगा गॅरेजमध्ये गेला असता त्याला गॅरेज अर्धवट बंद स्थितीत दिसून आले. त्याने याबाबतची माहिती आपल्या वडिलांना दिली. त्यांनी गॅरेजचे शटर उघडले. त्यावेळी मयुरेश हा गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. त्यानंतर १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande