पुण्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २२,८४३ प्रवाशांवर रेल्वेची कारवाई
पुणे 20 नोव्हेंबर (हिं.स) दिवाळीच्या काळात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडू
पुण्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २२,८४३ प्रवाशांवर रेल्वेची कारवाई


पुणे 20 नोव्हेंबर (हिं.स)

दिवाळीच्या काळात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून जोरदार कारवाई करण्यात आली आहे. गेल्या १६ दिवसात रेल्वेने तब्बल २२ हजार ८४३ फुकट्या प्रवाशांकडून तब्बल एक कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

दिवाळीच्या काळात रेल्वे गाड्यांना तुडूंब गर्दी होती. प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वेने काही विशेष गाड्या देखील सोडल्या होत्या. रेल्वेतील गर्दीचा फायदा घेत काही प्रवासी विना तिकिट प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक आणि तिकीट तपासणीस (टीसी) यांची नेमणूक केली होती. त्यानुसार दिवाळीच्या अगोदर व दिवाळीतील काही दिवस अशा १६ दिवसांमध्ये रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणारे २२ हजार ८४३ प्रवाशांना पकडण्यात आले आहे. त्यानुसार त्यांच्याकडून एक कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande