चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात बस चालक ठार
चंद्रपूर 20 नोव्हेंबर (हिं.स.)-चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील दक्षिण लोहारा नियतक्षेत्रातील जंगलात शाळेच
संग्रहित


चंद्रपूर 20 नोव्हेंबर (हिं.स.)-चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील दक्षिण लोहारा नियतक्षेत्रातील जंगलात शाळेच्या एका बस चालकावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज, सोमवारी दुपारी उघडकीस आली

यासंदर्भातील माहितीनुसार मनोहर वाणी हे लोहारा नियतक्षेत्रातील जंगलात एका छोट्या मंदिरात सकाळी पूजा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी वाघाने झडप घालून त्यांच्या नरडीचा घोट घेतला.सदर बाब दुपारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. मनोहर वाणी हे श्री जैन सेवा समिती संचालित विद्यानिकेतन हायस्कूल दादावाडी येथील शाळेत बस चालक म्हणून मागील १५ वर्षापासून कार्यरत होते. त्याच्या पश्चात दोन मुली व पत्नी असा परिवार आहे. वनविभागाने मृतकाचे कुटुंबियांना तातडीची २५ हजारांची मदत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेनंतर परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande