भारत-युके संरक्षण सल्लागार गटाची बैठक संपन्न
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : भारत-यूके वार्षिक संरक्षण सल्लागार गटाची बैठक संरक्षण सचिव गिरीध
भारत-युके संरक्षण सल्लागार गटाची बैठक संपन्न


नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : भारत-यूके वार्षिक संरक्षण सल्लागार गटाची बैठक संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि युनायटेड किंगडमच्या संरक्षण मंत्रालयाचे स्थायी सचिव डेव्हिड विल्यम्स यांच्या सहअध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झाली.

या बैठकीत दोन्ही सचिवांनी अनेक प्रादेशिक सुरक्षा मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी संरक्षण सहकार्य उपक्रमांचा आढावा घेतला, हिंद महासागर क्षेत्रातील परिस्थिती आणि संभाव्य सहकार्य तसेच क्षेपणास्त्र प्रणाली आणि इलेक्ट्रिक प्रचालनामधील संरक्षण औद्योगिक सहकार्य प्रस्ताव,यासह इतर शक्यतांवर चर्चा केली.

दोन्ही बाजूंनी संयुक्त सराव, सागरी क्षेत्रातील जागरुकता आणि माहितीची देवाणघेवाण यावर लक्ष केंद्रित करून दोन्ही बाजुंनी सागरी क्षेत्रातील परस्पर संवाद आणि संयुक्त उपक्रमांमध्ये वाढ करण्याचे नियोजन करण्याचे ठरवले.

त्यांनी भारत यूके 2 2 परराष्ट्र आणि संरक्षण संवाद सुरु केल्याबद्दल आणि सर्व क्षेत्रांमध्ये लष्कर ते लष्कर सहभाग वाढवल्याबद्दल प्रशंसा केली.

यानंतर डेव्हिड विल्यम्स यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थळी पुष्पचक्र अर्पण करून शूरवीरांना आदरांजली वाहिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande